आदिवासी कर्मचारी संघटना आमगांव तर्फे आशिष जियालाल पंधरे नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक यांचा सत्कार…..

0
996

आमगांव : तालुक्यातील छोट्याशा सोनेखारी गावातील आदिवासी समाजातील सामान्य कुटुंबातील आशिष जियालाल पंधरे यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हापरिषद शाळेत पुर्ण करून पुढील शिक्षण आदिवासी वस्तीगृह राहून शिक्षण पूर्ण केले.एका सामान्य कुटुंबातील मुलगा पोलीस उपनिरीक्षक उच्च पदावर स्पर्धा परीक्षेतून निवड झाली. आज आमगांव तालुक्यातील आदिवासी समाजासाठी गौरवास्पद अभिमान वाटतो.जिद्द चिकाटी मेहनत करून एवढ्या मोठ्या पदावर विराजमान होतांना आदिवासी समाजातील विद्यार्थांना प्रेरणा व आदर्श घेण्यासाठी एक उदाहरण आशिष पंधरे हा आहे.
आदिवासी समाजातील आशिष पंधरे यांची निवड होताच आदिवासी कर्मचारी संघटना आमगांव शाखेचे पदाधिकारी मा.संतोष कुसराम सर, मा. दादाजी पंधरे सर, मा.पंचाराम मडावी सर,मा. सुरज मडावी सर, मा. राकेश परतेकी सर मा. मनोज पंधरे सर या सर्व कर्मचारी पदाधिकारी यांनी त्यांच्या स्वगावी जाऊन आईवडिलांनसह शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
पुढील आयुष्यात यापेक्षाही उच्चपदावर जाण्यासाठी स्पर्धा परिक्षेची तयारी करावी व समाजाची मान उंचवावी हीच अपेक्षा ठेऊन पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देण्यात आले.