स्वामी विवेकानंद शाळा कारंजा येथे झाले वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0
103
1

गोंदिया : दि. ११ ऑगस्ट रोज रविवारला सकाळी सकाळी ८ वाजे निसर्ग प्रेमी सु:प्रभात परिवार गोंदिया यांनी मागील २९ जून २०२४ पासून ११ऑगस्ट२०२४ पर्यंत सतत प्रत्येक रविवारला चालवत असलेल्या वृक्षारोपण मोहीम अभियानाचे समापन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य उमेन्द्र उपराडे हे होतें, तर दीप प्रज्वलक कारंजा ग्रामपंचायत चे सरपंच नोकचंद कापसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक सोमेश्वर पटले, कारंजा ग्रामचे पोलीस पाटील सौं. अल्काताई रंगारी,अंबिका सार्वजनिक वाचनालय कारंजा चे सचिव टेकचंद बलभद्रे सर ,स्वामी विवेकानंद शाळेचे शिक्षिका सौं. सरुताई तूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,तर कार्यक्रमाला प्रामुख्याने मुख्य मार्गदर्शक म्हणून ज्यांचे मार्गदर्शन मिळाले तें सामाजिक वणिकरण तिरोडा विभागाचे आर.एफ ओ.सहेसराज आखरे सर हे होते.

कार्यक्रमात माँ शारदा व भारत मातेच्या तैलचित्राचे विधिवत पूजा अर्चना करून शाळकरी मुलांनी भारत मातेची वंदना व राष्ट्रगीत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.निसर्गदिना व्यतिरिक्त घरातील प्रत्येकानी व प्रत्येक घरांनी वृक्षारोपण करणे आज काळाची गरज आहे.नैसर्गिक संसाधनाचे महत्व कसे टिकवून ठेवता येईल हे आज जनते समोर मांडणे आवश्यक आहे, आपली पृथ्वी वेगवेगळ्या संसाधनांनी भरलेली आहे त्यात जल, जंगल, जमीन, स्त्रोत, खनिज, जै विविधता या सर्वांचे संरक्षण करणे आपले परम कर्तव्य आहे, हे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश जनते समोर ठेऊन, लोकशाहीचे चौथा आधार स्तंभ असलेले निर्भीड, निष्पक्ष पत्रकार देवेंद्र दमाहे,मोहन तवाडे,आकाश नागपुरे,यांचे सुप्रभात परिवार द्वारे त्यांच्या उत्कृष्ठ पत्रकारिता करिता सत्कार करण्यात आले. या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले त्यात परिवाराचे सदस्य दिगंबर लिचडे,लोकचंद डोणेकर,चंद्रशेखर भोंडेकर,देवेश पशीने,रविशंकर वालोदे,मनीष बलभद्रे,जगदीश राऊत,बाबुराव नंदेश्वर,इजराईल शेख,अरविंद रंगारी,कल्लू सुरसे,संजय खेडीकर,ईश्वर जनबंधू,हविंद्र बडोले,तिलकचंद ठाकूर,साहेबलाल बिसेन या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडले.त्यात उपस्थित परमेश्वर लिचडे, मुकेश वैदय, मिटदेवजी हरडे,संजय खेडीकर,किशोर खोडपे, अजय वाघाडे, सहेसराम पटले, वसंत रंगारी व इतर गावकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे संचालन शिवकुमार नागपुरे यांनी केले, तर कार्यक्रमाची प्रस्तावना आनंद पटले यांनी मांडले तर आभार प्रदर्शन मुकेश लांजेवार यांनी मानले.