चंद्रसेन भोयर यांची तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी निवड

0
274

आमगांव : तालुक्यातील बोरकन्हार येथे आज दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी चंद्रसेन श्रीराम भोयर यांची निवड दुपारी एक वाजता ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली.

ग्रामसभेत सरपंच रवींद्र घरात, उपसरपंच लखनसिंह कटरे, खुमेश कटरे अध्यक्ष विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संगीता कुभरे, मंगला कापसे, अनिल खडशिंगे, होपचंद टेंभरे, झुमक बोपचे, शैलेश मेश्राम (माजी सरपंच), ठाणसिंह राणे, भोजराज  ब्राम्हणकर, हरीराम करंडे ज्येष्ठ नागरिक, धनराज हुकरे आदि मान्यवर उपस्थित होते.