आमगाव : आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथे दिनांक १३ ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग गोंदिया तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले गेले.
या शिबिरात शाळेचे प्राचार्य डी एम राऊत यांच्या अध्यक्षतेत सामाजिक न्याय नागपूर विभागाचे सहाय्यक आयुक्त आर एस पांडे यांनी मार्गदर्शन केले. १२ वी च्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळीसाठी होणारी धावपळ होऊ नये या साठी नेमके कोणते दस्तावेज तयार करावे या विषयावर विद्यार्थ्यांसोबत विस्तृत संवाद साधला.
या मार्गदर्शन शिबिराचे संचालन प्रा. कु टी टी पटले व आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक यू एस मेंढे केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा एस एस प्रजापती, वि एल धकाते व कोळवते मॅडम यांनी प्रयत्न केले.