सालेकसा / बाजीराव तरोने
तालुक्यातील पाथरीयेथिल सर्व ग्रामस्थ व भाविकांनी कुवाढास नदीच्या हजराफॉल मधून जल घेऊन पाथरीच्या शिवमंदिरात अभिषेक करायचा होता त्या प्रसंगी सालेकसा येथे कावड यात्रा आली असता यात्रेत सहभागी भाविक भक्तांना शिवसेना सालेकसा च्या वतीने बिस्कीट व पाणी वितरित करण्यात आले.यावेळी जिल्हा समन्वयक डॉ. हिरालाल साठवणे, तालुकाप्रमुख विजय नागपुरे, युवा प्रमुख मायकल मेश्राम, शहर प्रमुख बाजीराव तरोने, नरेश बिसेन, दिनेश कोंबडिबुरे, ललित कीरसान, लोकेश कोरे, विक्की नागपुरे, झनक नागपुरे, घनश्याम नागपुरे, संतोष लिल्हारे, सुरेश नागपुरे, हेमराज लिल्हारे या शिवसैनिकांची उपस्थिती होती.