सालेकसा/बाजीराव तरोने
पंचायत समिती सालेकसा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हलबीटोला येथे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
गडचिरोली लोकसभा क्षेत्रात विविध शाळेला संदिच्छा भेट देऊन उपक्रम राबविले जात आहे. त्यांचे चिरंजीव एड.दुष्यंत किरसान यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, नोटबुक वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाजीराव तरोने यांनी किरसान यांना शाळेसंबंधी विविध समस्या मांडल्या.या साहित्य वाटप कार्यक्रमाला विजय फुंडे, कैलाश भोयर, आशुतोष असाटी, राजेश प्रधान, देवेंद्र डोंगरे, योगराज गावराने, अंजय घरडे, ललित किरसान, यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक वाय.डी. अंबादे, आर. एम. भोयर, कु.एस.एम .जाधव , एम. एस. राठोड यांनी परिश्रम घेतले.

