गोंदिया : १५ आगष्ट स्वातंत्र दिनानिमित्त खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. देशाची संवैधानिक मूल्य आणि सामाजिक न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दृढ वचनबद्धता याकरीता ध्वजारोहण कार्यक्रमानंतर संविधानाचे सामुदायिकरीत्या वाचन करण्यात येणार आहे. याप्रसंगी जास्तीत जास्त संख्येने नागरिक, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाची पूर्व तयारी करिता गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस सर्व सेल / घटक पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, विनोद हरिणखेडे, अशोक सहारे, नानू मुदलियार, प्रेम जायस्वाल, केतन तुरकर, मनोहर वालदे, विनीत सहारे, सुनील भालेराव, माधुरी नासरे, कुंड दोनोडे, आशा पाटील, खालिद पठाण, मोहन पटले, आनंद ठाकूर, राजकुमार जैन, हरगोविंद चौरसिया, अजय वढेरा, गोपीचंद थावानी, विनोद पंधरे, दिनेश अग्रवाल, अजय जयस्वाल, झनकलाल ढेकवार, सुरेश अग्रवाल, हरबक्ष गुरुनानी, मयूर दरबार, राकेश वर्मा, एकनाथ वहिले, राजेश वर्मा, प्रदीप ठवरे, विजेंद्र जैन, राजेश दवे, गुड्डू बिसेन, कुलविंदर भाटिया, नत्थू भाटिया, राज शुक्ला, आर डी अग्रवाल, सौरभ जायस्वाल, महेश करीयार, प्रितपाल सिंग वोरा, अनुज जयस्वाल, दिलप्रीतसिंग वोरा, संदीप पटले, लव माटे, राहुल वालदे, नागो बन्सोड, प्रशांत सोनपुरे, पुस्तकला माने, रचित चौहान, सुदर्शना वर्मा, शर्मिला पाल, पंचशीला मेश्राम, संगीता माटे,चंद्रकला सहारे, सोनम मेश्राम, मिलन बैस, तुषार उके, रिंकू शर्मा,श्रेयश खोब्रागडे, सोहनलाल गौतम, गौरव शेंडे, वामन गेडाम सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.