पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दौरा कार्यक्रम

0
526
1

गोंदिया,दि.13 : पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे 14 व 15 ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन व शासकीय विश्रामगृह गोंदियाकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व राखीव. सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 ते 1.30 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात डोंगरी विभाग विकास कार्यक्रम बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून शासकीय विश्रामगृह गोंदियाकडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व मुक्काम.

         15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथून पोलीस मुख्यालय मैदान कडे प्रयाण. सकाळी 8.50 वाजता पोलीस मुख्यालय मैदान गोंदिया येथे आगमन. सकाळी 9 वाजता झेंडावंदन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालय मैदान गोंदिया येथून बिरसी विमानतळ गोंदियाकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 10.30 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन व गडचिरोलीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतील.

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

       भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता पोलीस मुख्यालय मैदान, कारंजा येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.