आमगाव – भवभूती शिक्षण संस्था आमगाव द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे आज नशा मुक्त भारत अभियानातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून नशा मुक्तीची प्रार्थना वदवून घेतली.
संपूर्ण जग अमली पदार्थांच्या व्यसनाधीनेधीनतेचा सामना करत आहे, ज्याच्या व्यसनाधीन व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्या मोठ्या वर्गावर घातक परिणाम होत आहे नशा मुक्त भारत अभियान विविध उपक्रमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आणि मादक पदार्थांच्या दुरुपयोगाबद्दल जागरूकता पसरविण्याचा मानस आहे.
सदर कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयातील डी. फार्मसी व बी. फॉर्मसी च्या राष्ट्रीय सेवा योजना तर्फे विद्यार्थ्यांकडून नशा मुक्तीची प्रार्थना बोलून विद्यार्थ्यांना नशा मुक्तीचे उद्देश व वैशिष्ट्ये प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर यांनी समजून सांगितले.
नशा मुक्ती भारत अभियाना अंतर्गत नवचेतना या कार्यक्रमाची बद्दल संस्थेचे टेक्न. ॲडव्हायझर डॉ. डी.के. संघी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व सहकारी उपस्थित होते.

