आमगांव : नगर परिषद आमगाव येथे “हर घर तिरंगा” म्हणजेच “घरोघरी तिरंगा” अभियाना अंतर्गत नगर परिषदेतील कर्मचारी श्रीकिसन ऊके यांचे हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाले.
ध्वजारोहण समारंभानंतर देशभक्ती गीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.भूजाडे (नायब तहसिलदार, निवडणूक) व खंड विकास अधिकारी मा.गिरेपूंजे होते,तर अध्यक्ष स्थानी मा.वेलादी (नायब तहसिलदार )
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे संयोजक संदीप बावनथडे, शैलेश डोंगरे, मुकेश कुमार वाकले,रतिराम डेकाटे, राजेन्द्र शिवणकर, तिलकसिंह परिहार, ज्ञानेश्वर कारेकर, लक्ष्मीनारायण श्रीवास्तव,निलकंठ हूकरे, देवेंद्र शिवणकर, राजेश डोंगरे, रामेश्वर श्रीभादरे, माधोराव मुनेश्वर, संजय चुटे, ओमप्रकाश रहांगडाले, मंगेश बोपचे,हंसकला गायधने,शारदा चौधरी इत्यादी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकिसन ऊके यांनी केले.

