आमगांव : दिनांक 14/ 8 /2024 रोज बुधवारला के.के. इंग्रजी प्रायमरी शाळा आमगाव येथे नवनिर्वाचित विद्यार्थी मंत्रिमंडळाचा संपथ विधी सोहळा संपन्न करण्यात आला. शपथविधी सोहळ्याच्या वेळी शाळेच्या प्राचार्या श्रीमती रीना भुते, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यात श्रीमती रीना भुते मॅडम यांनी मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना बॅचेस लावून सन्मानित केले तसेच सर्व सदस्यांकडून शपथ घेण्यात आली व त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली. तसेच शैक्षणिक वर्ष 2024 -25 च्या कार्यकारिणी ची जबाबदारी सोपविण्यात आली. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच संस्थेचे कार्यवाह केशवराव मानकर व कार्यकारी डी.के. संघी सर यांनी सुद्धा मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनगणमन राष्ट्रगान म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

