सालेकसा : तालुक्यातील जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा हलबिटोला सालेकसा येथे भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलिस निरीक्षक भूषण बुराडे ,ध्वजारोहक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाजीराव तरोने, प्रमुख पाहुणे न प माजी उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई, माजी सैनिक रमेश गावराने,माजी सैनिक प्रल्हाद शेंडे,सुशील असाटी, पत्रकार मायकल मेश्राम, सुमेद चंद्रिकापुरे,उपाध्यक्ष सविता घरडे, सदस्य अनिंद्र चौधरी, बबलू मानकर, भोजराज किरसान, कोमलता डोंगरे, रत्नमाला किरसान कला गावराने, स्वेता घरडे, मीना काठेवार , बबलू शिवणकर, काशीनाथ पाथोडे, पालक वर्ग, गावातील नागरीक, युवक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आर.एम.भोयर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक वाय.डी.अंबादे, कु.एस एम जाधव , एम.एस.राठोड यांनी परिश्रम घेतले.

