सुकळी /टाणेश्वर तुरकर
भंडारा जिल्हातील सुकळी (नकुल) येथे वैनगंगा नदीच्या काठावर बमलेश्वरी माते चे जागृत मंदिर असून शिवलिंग स्थापीत आहे. काल गुरुवारी गावातील या मंदिरात नंदी पाणी पीत असल्याची एकच बोंब उडाली.विविध समाज माध्यमांवर नंदी पाणी पीत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. अनेकांना यात चमत्कार वाटला. खरे तर असे चमत्कार आधी सुद्धा विविध ठिकाणी झाले आहेत. खरे तर हा चमत्कार नसून दगड किंवा सिमेंट हा पाणी शोषून घेत असल्यामुळे नंदी दूध पिल्याचा किंवा पाणी पिल्याचा भास होतो असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. खरे तर हा प्रत्येकाचा आस्थेचा चा विषय असून काल नंदी पाणी पिल्याच्या बातमीवरून सुकळी व परिसरातील लोकांमध्ये एकच तारांबळ उडाली. व नदीला पाणी पिण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. अनेकांना हा दैवी चमत्कार वाटत होता.