आमगाव : प्रख्यात समाजसेविका व वीरांगणा अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र शासन द्वारा पुरस्काराने सन्मानित स्वर्गीय जयश्री संतोष पुंडकर यांचे श्रद्धांजली दिन डॉ. प्राचार्य श्रीराम भुस्कुटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले .
पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि परिसरातील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील राहत होत्या. एका व्यक्तीच्या निधनामुळे पूर्ण पोलीस स्टाफ दुखी होताना मी आपल्या 14 वर्षाच्या कारकिर्दीत जयश्री पुंडकर यांच्या निधनाच्या वेळी पाहिले असे उद्गार पोलीस निरीक्षक मा. तिरुपती राणे यांनी व्यक्त केले.
समाजसेविकेचे स्वरूपात मला जयश्री पुंडकर यांनी घडविले त्या माझ्या प्रेरणास्त्रोत आहेत त्यांच्या स्वरूपात एक झुंजारू नेतृत्व मी अनुभवले त्यांचे जीवन भविष्यात अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल असे श्रद्धांजलीपर सौ. आरती जांगडे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना देवरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
श्रद्धांजली कार्यक्रमात इतिहासकार प्राचार्य ओ सी पटले यांनी भाव संवेदना व्यक्त केली की जयश्री ह्या समाजसेवा लोक -मंगल साठी समर्पण भावाने कार्य करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांच्या निधनाने झालेली हानी भरून निघणे अशक्य आहे.
जयश्री पुंडकर चे व्यक्तित्व व नेतृत्व क्षमता ही अद्वितीय होती जयश्री पुंडकर सारखी अष्टपैलू समाजसेविका आता पुन्हा होणे नाही असे भाव अत्यंत दुःखी अंत:करणाने प्राचार्य व्ही.डी. मेश्राम यांनी व्यक्त केले.
जयश्री फुंडकर प्रतिष्ठित समाजसेविका होत्या व त्या निष्पक्ष, निर्भीड, व स्पष्ट वक्त्या होत्या व त्या कोणतेही कार्य जिद्दीने करीत असत समाजकार्याची त्यांची तळमळ सदैव आम्हा सर्वांना आठवणीत राहील असे भावोद्गार विदर्भ प्रचार प्रमुख माहेश्वरी संघटना सुनीता मल यांनी व्यक्त केले.
जयश्री पुंडकर यांच्या कमी वयात निधनाने संपूर्ण परिसरात शोक कडा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून त्या जीवन जगल्या त्यांचें बहुआयामी व्यक्तीत्व समाजासाठी सदैव प्रेरणादायक ठरेल असे श्रद्धांजली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी आपली दुःखद संवेदना व्यक्त केली .
याशिवाय पीएसआय अक्षय वळसे पाटील, पीएसआय दिपाली साळुंखे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बाय संघटना राहुल वंजारी, राष्ट्रवादीचे नेते रवी क्षिरसागर, वेलनेस कोच रवींद्र येटरे, संगीता कळव सीआयडी ऑफिस गोंदिया, नंदकिशोर द्रवे पो.स्टे. वर्धा आणि आप्त, स्वकीय आणि मित्र परिवार व संबंधित महिला पुरुष मोठ्या संख्येने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते. संचालन प्राचार्य व्हीं. डी. मेश्राम यांनी केले. शेवटी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.