उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस पाटील नर्मदा चुटे यांना उपभागीय अधिकारी कविता गायकवाड हस्ते सत्कार

0
230
1

आमगाव : सन 2023- 2024 या वर्षात महसूल विभागात येणाऱ्या विविध योजना तसेच गावात शांतता व सुव्यवस्था राखणे, गावातील तंटामुक्तीत मोलाचे कामगिरी बजावणे, आणि पोलीस विभागाअंतर्गत पोलिसांना वेळोवेळी रात्र – अपरात्री तसेच गोपनीय कामात मदत, गुन्हे तपासी, आरोपी शोध घेणे इत्यादी केलेल्या स्पृहनिय कामगिरी बाबत आणि शासनास दिलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमगाव येथील पोलीस पाटील सौ नर्मदा राधाकिसन चुटे यांना तहसील कार्यालय देवरी येथील सभागृहात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देवरी श्रीमती कविता गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी तसेच आमगाव, सालेकसा, देवरी तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.