500 ते 600 युवकांची हजेरी, 108 बेरोजगार युवकांची निवड
आमगाव :भवभूती महाविद्यालय आमगाव येथे दि.१६ ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यावेळी ५०० ते ६०० युवकांनी हजेरी लावली.यावेळी 108 बेरोजगार युवकांची निवड करण्यात आली. पोलीस विभाग व एस आय एस यांच्या संयुक्त विद्यमानाने नक्षलग्रस्त जिल्ह्यात दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील भवभूती महाविद्यालय आमगाव येथे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रोजगार मेळाव्यात आमगाव तालुका तसेच जिल्ह्यातील ५०० ते ६०० बेरोजगार युवक सहभागी झाले होते सदर बेरोजगार युवकांचे वजन, उंची, छाती व कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यामधून 108 युवकांची सुरक्षा गार्ड म्हणून नियुक्ती करण्यात आली असून 108 बेरोजगार युवकांना रोजगार मेळाव्यात रोजगार मिळालेला आहे.
सदर रोजगार मेळावा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय वळसे, महिला पोलीस हवालदार सत्यशिला छिपे, पोलीस शिपाई सुरेंद्र लांजेवार तसेच नक्षल सेल गोंदिया येथील अंमलदार यांनी सहकार्य केले.