हनुमान मंदिर परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

0
112

आमगांव:- श्री सिद्ध संकटमोचन हनुमान मंदिर, वसंत नगर येथे वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात. तसेच सामाजिक उपक्रम सुद्धा घडवून आणतात व हिंदुत्वाचा जागर,राष्ट्रीयताची भावना निर्माण करण्याचे कार्य मंदिर समिति तर्फे होत असतो.
ह्याच श्रृंखला मध्ये दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्यात येतो.
यावर्षी 15 ऑगस्टला स्वतंत्रता दिना निमित्त श्री सिद्ध संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. सर्वात आधी पूजन करण्यात आले. व नंतर श्री सिद्ध संकटमोचन हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाष आकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी हनुमान मंदिर समितीचे सचिव दिनेश शेंडे,सहसचिव दिनेश चिंचाळकर,कोषाध्यक्ष सुरेश कोसरकर,सदस्य नरेन्द्र बहेटवार,सतीष साखरकर, विजय लिल्हारे, हतिस कावळे, तसेच मंदिर समितिचे सक्रिय कार्यकर्ते व नगरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleआमगाव येथील रोजगार मेळाव्यात बेरोजगार युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleकलकत्यामध्ये..! मारली महिला..!!