नाही सुरक्षित ! महिलांच्या जाती !!
अत्याचार होती ! दररोज !! १ !!
महिला सुरक्षा ! फक्त हो कागदी !!
महिला आजादी ! होई केव्हा !!२!!
पाहा दवाखाना ! शाळा नी ऑफिस !!
सुरक्षा विश्वास ! राहिले का !!३!!
देवाच्याही रुपे ! आहेत डॉक्टर !!
कैसे त्यांच्यावर ! अन्याय हो !!४!!
कलकत्यामध्ये ! मारली महिला !!
मिळेल का तीला ! न्याय सांगा !! ५ !!
दवाखान्यातही ! होती बलात्कार !!
काय त्यांच्यावर ! दंड सांगा !!६!!
बलत्कारी यांच्या ! गळ्या घाला फंदा !!
मोकळा दरिंदा ! ठेवू नये !! ७ !!
अत्याचारी यांना ! नाही जाती धर्म !!
नामर्दांचे कर्म ! केला ज्यांने !! ८ !!
वासनेच्या पायी ! वेशी दरिंद्यानी !!
केला मानहानी ! महिलेची !!९ !!
वासनेची भूक ! इतकी वाढली !!
बहिणा लडली ! असहाय्य !!१०!!
देशाच्या सेवेत ! महिला लढल्या !!
स्त्री ही खेळल्या ! क्रीडांगणी !!११ !!
विविध क्षेत्रात ! नाव गाजविले !!
प्राण सुद्धा दिले ! देशासाठी !!१२!!
कवी – हिरदीलालजी ठाकरे, नागपूर.

