आमगाव – आमगाव तालुक्यातील निवडणूक अधिकारी जी. एस. भुजाडे, व सी. एच. गजभिये, नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाने येथील भवभूती शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या सेमिनार हॉलमध्ये दि.२० ऑगस्ट रोजी मतदान जनजागृती व नवीन वोटर नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
समाजातील सर्वच घटकांना मतदान प्रक्रियेत सामील करून घेऊन नवीन मतदार तसेच महिला, दिव्यांग, पारलिंगी, संघटित, व असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्यापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात मतदार जनजागृती मोहीम राबवून त्यांना मतदान करण्यात उद्युक्त करण्याचे आव्हान कार्यक्रमाप्रसंगी जी. एस. भुजाडे यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर यांनी मोहिमेत सर्वच समाज घटकांना विविध प्रसिद्धी माध्यमाच्या प्रभावी वापर तसेच महाविद्यालयात नियुक्त करण्यात आलेले कॅम्पस अँबेसिडर यांच्या सहकार्याने अधिकाअधिक समाज घटकापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन समजावून सांगितले.
सदर कार्यक्रमादरम्यान तहसील ऑफिसचे सी. ए. बिसेन व एस. बी. बागडे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक महेंद्र तिवारी, देवेंद्र बोरकर, जितेंद्र शिवणकर, अनिल सोरी, दीपिका बोपचे, परमेश्वर वानखेडे, दीक्षा खोब्रागडे, वैशाली चुटे व रोशनी अग्रवाल उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संचालक केशवराव मानकर व टेक्नि. ॲडव्हायझर डॉ. डी. के. संघी यांचे मार्गदर्शन लाभले.

