भामरागड:- राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे भूगोल विभागाव्दारे डॉ. कैलास व्हि. निखाडे यांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडाला राखी बाधूण रक्षाबंधन कार्यक्रम सपन्न केला. तसेच महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी प्रत्येक झाडाला राखी बांधून त्यांचे सवर्धन करण्याची शपथ घेतली. व झाडे जगवा व झाडे लावा अश्या प्रकाराचा नारा दिला. या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष महाविद्यालयांचे जेष्ठ प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी उपाय योजना सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. संतोष सं. डाखरे सरांनी पर्यावरणाचे महत्तव विद्यार्थी आणि विद्यार्थींना सागीतले. तसेच प्रा. मोरानडे सर यांनी झाडा चे संवर्धन करण्यासाठी उपाय योजना सांगितले तसेच प्रा. विशाल तायडे सरांनी झाडाचे फायदे सांगितलें . कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी श्री. बंडू बोन्डे यांनी मदत केली.
© Newspaper WordPress Theme by TagDiv