आमगांव : दि २० ऑगस्ट २०२४ रोजी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय (आमदार ऑफिस)आमगाव येथे आधुनिक भारताचे जनक माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्या अर्पण करून “सद्भावना दिवस” साजरा करण्यात आला.
यावेळी संजय बहेकार अध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमेटी आमगाव, भूमेश्वर मेंढे वरिष्ठ कॉंग्रेस कार्यकर्ता, दिलीप टेंभरे गोंदिया जिल्हा किसान कॉंग्रेस उपाध्यक्ष, अजय खेतान शहर अध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमेटी आमगाव, रामेश्वर श्यामकुवर अध्यक्ष अनु.जाती. तालुका कॉंग्रेस कमेटी आमगाव, महेश उके सचिव तालुका कॉंग्रेस कमेटी आमगाव, बलीराम कोटवार साहेब, श्याम देशमुख ता.उपाध्यक्ष कॉंग्रेस कमेटी आमगाव, रवि राहांगडाले ता. उपाध्यक्ष कॉंग्रेस कमेटी आमगाव, रमेश पवार शहर कॉंग्रेस उपाध्यक्ष आमगाव, राजा (दिपक) कोरोटे अध्यक्ष युवक कॉंग्रेस विधानसभा क्षेत्र, उज्वल बैस (ठाकूर) महासचिव युवक कॉंग्रेस गोंदिया जिल्हा, राहुल चुटे उपाध्यक्ष युवक कॉंग्रेस विधानसभा क्षेत्र, परमेश कामडे तालुका अध्यक्ष युवक कॉंग्रेस कमेटी आमगाव, रामदास गायधने सामाजिक कार्यकर्ता कॉंग्रेस कमेटी किडंगीपार, रवींद्र भोयर कॉंग्रेस कार्यकर्ता बोरकन्हार, मुन्नेलाल उइके अध्यक्ष अनु. जमाती ता. कॉंग्रेस कमेटी, सुनील मोटघरे ता. सचिव ओबीसी कॉंग्रेस कमेटी आमगाव, चंद्रशेखर वालदे कॉंग्रेस कार्यकर्ता सरकारटोला हंसराज जोशी उपाध्यक्ष अनु. जमाती ता. कॉंग्रेस कमेटी आमगाव, योगेश कोरे युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष, पवन कोटवार, आदर्श मेश्राम तसेच अन्य काँग्रेस कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

