आमगाव : एससी आणि एसटी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने उपवर्ग बनविण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे एस. सी. आणि एसटी आरक्षणामध्ये क्रिमिलियर्स ची अट लादली आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा याकरिता एससी एसटी आणि ओबीसी संघटनांनी भारत बंद-गोंदिया बंदची हाक दिलेली आहे. दरम्यान आज आमगाव बंदला अंगात तालुका काँग्रेस कमिटी व आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी समर्थन दिले असून यावेळी तालुका अध्यक्ष संजय बहेकार, शहराध्यक्ष अजय खेतान, पंचायत समिती सदस्य, तारेंद्र रामटेके, रामेश्वर श्यामकुवर, जगदीश चुटे, किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप टेंभरे,तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
आमगाव बंद ला आमदार कोरोटे व काँग्रेस पक्षाचा समर्थन
1