पोलीस भरती सन २०२२-२३ : निवडपात्र उमेदवारांना प्रशिक्षणाकरिता सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत पाठविण्यात येणार

0
789

पोलीस भरती विषयी महत्त्वाची अपडेट….

न्यूजप्रभात वृतसंस्था/मुंबई : सन २०२२-२०२३ या वर्षातील रिक्त पदांची भरती करण्याकरीता राज्य शासनाने मंजूरी दिल्यानंतर पोलीस भरतीची जाहिरात ०५ मार्च २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली. पोलीस शिपाई ९ हजार ५९५ पदे, चालक पोलीस शिपाई १ हजार ६८६ पदे, बॅण्डस्मन ४१ पदे, सशस्त्र पोलीस शिपाई- ४ हजार ३४९ पदे, कारागृह शिपाई १ हजार ८०० पदे असे एकूण १७ हजार ४७१ पदे भरण्याकरीता जाहिरात देण्यात आली होती. त्यासाठी एकूण १६ लाख ८८ हजार ७८५ इतक्या उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले होते. १९ जून २०२४ पासून सर्व घटकांमध्ये मैदानी चाचणी, कौशल्य चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेणेबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

पोलीस शिपाई पदाचे एकूण ९ हजार ५९५ रिक्त पर्दाकरिता एकूण ४६ जिल्हा / आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यापैकी ४५ जिल्हा व आयुक्तालयामध्ये प्रक्रिया पूर्ण झाली आहे व निवडपात्र ७ हजार २३ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. फक्त मुंबई शहरची मैदानी चाचणी सुरु आहे.

चालक पोलीस शिपाई पदाचे एकूण १ हजार ६८६ पर्दाकरिता एकूण २६ जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यांत येत असून त्यापैकी २४ जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुंबई शहर व पुणे शहर येथील प्रक्रिया सुरु आहे.

बॅण्डस्मन पोलीस शिपाई यांची एकूण ४१ पदांकरिता एकूण १४ जिल्हा व आयुक्तालयात भरती प्रक्रिया राबविण्यांत येत असून त्यापैकी १३ जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून १७ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुंबई शहरची प्रक्रिया सुरु आहे.

राज्य राखीव पोलीस बलाच्या १९ गटामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून सर्व ठिकाणी ४ हजार ३४९ निवडपात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

कारागृह शिपाई यांची १ हजार ८०० पदांकरिता ४ घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरु आहे.

अशाप्रकारे एकूण १७ हजार ४७१ रिक्त पदांपैकी ११ हजार ९५६ पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना नियुक्तीपत्रे देणे सुरु आहे व निवडपात्र उमेदवार जिल्हा मुख्यालयात लवकर कर्तव्यार्थ हजर होतील.

या ११ हजार ९५६ निवड झालेल्या उमेदवारांमध्ये खुल्या प्रवर्गातील २ हजार ८९०, आर्थिक दुर्बल घटक १ हजार १३२, एसईबीसी-१ हजार ९७, इमाव-२ हजार ५४२, विमाप्र २९३, भज-ड-२४५, भज-क-४४५, भज-व-३३४, विजा-अ-३४४. अज-१ हजार ९८. अजा-१ हजार ५३९ याप्रमाणे समावेश आहे.

या सर्व निवडपात्र उमेदवारांना माहे सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत मुलभूत प्रशिक्षणाकरिता पाठविण्यांत येणार आहे.

Previous articleसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन ; 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक
Next articleपुस्तक परीक्षण