आमगाव- आज पासून एक वर्षापूर्वी भारत चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश बनला होता. चांद्रयान ३ मिशनच्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले होते, त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाश दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती, त्या निमित्ताने आज श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगाव येथे पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर व प्रा. रोशनी अग्रवाल, प्रा. राणी भगत, प्रा. चेतन बोरकर व सर्व प्राध्यापक गण उपस्थित होते. सदर कार्यक्रमानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात ८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जगणे व आभार प्रदर्शन प्रा. रोशनी अग्रवाल यांनी मांडले.

