जिल्हस्तरिय बैडमिंटन स्पर्धेत के के स्कूलच्या मुलींनी मारली बाजी

0
357

 विभागीय स्पर्धेसाठी झाली निवड

आमगांव :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गोंदिया द्वारा आयोजित, जिल्हास्तरीय बैडमिंटन क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुल,मरारटोली, गोंदिया येथे झालेल्या जिल्हास्तरिय बैडमिंटन स्पर्धेत येथील के के इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थिनी कु.कोमल सरवरे,कु. पूर्ति शेंडे, कु.साक्षी बावनथडे, कु.श्रेया असाटी यांनी 17 वर्षे वयोगटात विजय प्राप्त केला आहे.
याआधारे त्यांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल भवभूति शिक्षण संस्थाचे कार्यवाह केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेशबाबू असाटी,उपाध्यक्ष प्रमोद कटकवार,शाळेचे कार्यकारी डी के संघी,मुख्याध्यापक रिना भूते, प्रशिक्षक मुकुल अग्रवाल यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.