आमगांव : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा निषेध म्हणून आमगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काळीपट्टी लावून मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या निषेधाची नोंद केली. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हे निदर्शन आमगाव तालुका तहसील कार्यालयासमोर केले. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त करताना असे सांगितले की, “महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेबाबत सरकार अपयशी ठरले आहे. बदलापूर येथील घटनेने महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या घटनेत गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर देखील चौकशी व्हावी, ही आमची ठाम मागणी आहे.”या मोर्चानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना राज्यपालांच्या नावे एक निवेदन दिले., ज्यामध्ये बदलापूर येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.
या निवेदनात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच राज्यातील महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची विनंती ही करण्यात आली आहे.
बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आमगाव तालुका तर्फे जाहीर निषेध
1