गोंदिया : गत काळातील राजकारणाच्या इतिहासाची पाने चाळल्यास आपल्या लक्षात येईल की,शिक्षण,आरोग्य, निवारा,शेती व पिण्याच्या पाण्याची सोय,दळनवळणाची साधने उपलब्ध करने, या सर्वच आघाडय़ांवर प्रफुलभाई पटेल यांचे कार्य अग्रेसर असल्याचे लक्षात येते.
स्व.मनोहरभाई पटेल यांच्या राजकारणाचा वारसा ते अत्यंत निष्ठेने ,प्रामाणिकपणाने व समर्पित भावनेने पुढे नेत असल्याचे चित्र आहे.
यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणांवर व खासदार मा.प्रफुलभाई पटेल यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुलचूर च्या वतिने आयोजित कार्यकर्ता सहविचार सभेत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
सभेचे आयोजन शनिवार ता.24 रोजी,सांय.8 वाजे हरीचंद पटले फूलचूर यांच्या सभागृहात करण्यात आले होते.
विचार मंचकावर गोरेगांव तालुकाध्यक्ष केवलरामभाऊ बघेले,जिल्हा सरचिटणीस प्राचार्य खुशाल कटरे(से.नि.),शास्त्रीवार्ड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राजेश कापसे,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे सरंक्षक श्रीधर चन्ने उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रस्तुत करतांनी केवलरामभाऊ बघेले यांनी सरकारला समर्थन देण्याचे कारणे कोणती?शासनाच्या विविध योजना कोणत्या?राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची जनकल्याणासी बांधीलकी चा इतिहास इत्यादी विषयांवर सभेसमक्ष विस्तृत माहीती दिली.
आगामी विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतिने गोंदिया विधान सभा क्षेत्रासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांना उमेद्वारी देण्यासाठी पार्टी वरीष्ठांकडे आग्रह राहील असे घोषित केले.
या प्रसंगी महेश अंबुले,कमलेश कटरे,राजकुमार बघेले,कैलास नागपूरे,ग्रा.प.सदस्य सौ.दुर्गा महेश राऊत,ग्रामपंचायत.प.सदस्या सौ.रविकांता कैलास नागपूरे,आरतीताई वाघाडे, शोभाताई राऊत,रजनीताई रामप्रसाद लिल्हारे, कमलाताई कमलप्रसाद लिल्हारे, लक्ष्मीताई रामप्रसाद लिल्हारे, पुजाताई सोनवाने,रेखाताई लिल्हारे, कन्हैय्या रहांगडाले,अनिल हरीनखेडे,धनलाल शहारे,राजु निषादराज,संजय पारधी,सुरेश अंबुले,राजकुमार पटले,बाल युवक गणेश उत्सव सोसायटी चे सर्व पदाधिकारी,रंजित बघेले,कार्तीक लिल्हारे, राज अंबुले,यश अंबुले,भुषण अंबुले,करन लिल्हारे,शिवाश रहांगडाले,निखिल नागपूरे,प्रदिप फुलबांधे, मोहित लिल्हारे, दुर्गेश बनोटे, रवि दमाहे, शंकर राऊत,प्रभाकर ठाकरे व अन्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.
सभेत उपस्थितांचे आभार खुशाल कटरे यांनी मानले.