जनसन्मान यात्रे संबधी तुमसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ची महत्वपूर्ण बैठक संपन्न

0
129

तुमसर /अतुल पटले

महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यात ‘जनसन्मान’ यात्रा सुरु झालेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल पटेल या यात्रेच्या निमित्तानं सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. ही यात्रा आगामी १ सप्टेंबर २०२४ ला माननीय तुमसर शहरात दाखल होऊन त्या यात्रेचे मातोश्री सभागृहामध्ये दुपारी १. ०० वाजता सभेत रूपांतर होणार आहे. या यात्रेच्या आणि सभेच्या जाय्यत तयारी आणि नियोजनसाठी तालुका राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची अतीथी सभागृह तुमसर येथे आज दि. २५ आगस्ट ला दुपारी १२. ३० वा. मा. आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व तालुकाधक्ष् धनेंद्र तूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलविण्यात आली होती.   दि. १ सप्टेंबर ला ठिक ११. ०० वाजता खापा चौकात जनसंन्मान यात्रेचे आगमन होणार आहे. याप्रसंगी त्यांचे, जंगी स्वागत, रॅलीचे आणि तुमसर शहरातील ठीक ठिकाणी लागणाऱ्या बॅनर आणि नंतर होणाऱ्या सभेचे योग्य नियोजन यावर उपस्थिती प्रमुख अतिथी आणि कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी साधक बाधक चर्चा करण्यात आली. आणि ही यात्रा भव्य दिव्य कशी करण्यासाठी प्रत्येकानी जबाबदारी स्वीकारावी येईल यावर प्रकाश घालण्यात आला. या बैठकीला विधानसभा प्रमुख देवचंद ठाकरे, माजी नागराधक्ष अभिषेक कारेमोरे, राजेश देशमुख, सुनील थोटे, जि. प. सदस्य राजू ढबाले, पमाताई ठाकूर, याशिन छवारे, सुरेश रहांगडाले,योगेश सिंगणजुडे, निशिकांत पेठे, मनोज वासनिक, मनोज झुरमुरे, राहुल भवसागर, सलाम तूरक, तोशल बुरडे, अजय बिसने, देवेंद्र शहारे, उमेश तूरकर,सचिन बवनकर, सरोजताई भुरे, माणिकराव ठाकरे, शालिक गौपाले, तेजराम ठाकरे, नंदाताई डोरले, कविता साखरवाडे, सचिन भोयर, खेमराज गभने, लखन मोरे, अजय भुसारी, कपिल जैन, सुधीर पुंडे, राजेंद्र बघेले , शलिनीताई पेठे, वंदना चकोले, भूपेंद्र नागफासे, पारस भुसारी ,अमित टेकाम, पूनम पाठक ,कलाम शेख बपेरा ,सुनिल पटले ,संजय रहांगडाले, संदीप डहाट,नामदेव हटवार, सुकलाल सिंदपुरे, मीना गाढवे, राहुल वासनिक, विजया चोपकर, दिलीप सोनवाने, गोल्डी घडले, चंदू बन्सोड, गोलू गौतम,सुरेश गोखले ,पुरणलाल टेकामजी ,ओमेश्वर वासनिक, सुनील रहांगडाले रंजनाताई तूरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.