महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे नक्षलग्रस्त भागात रक्षाबंधन

0
457
1

आमगाव : बहिण भावाच्या पवित्र रक्षाबंधनासाठी अहर्निश सेवा देणारे राज्यातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असताना रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्ताने पोलीस बांधवांनी मनात इच्छा असताना सुद्धा. स्व: गावी जाता येत नाही त्याची दखल घेत महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष जयश्री पुंडकर यांनी मागील काही वर्षा पासून रक्षाबंधन चे पवित्र कार्य सुरू केले होते. ती परमपंरा कायम ठेवत महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेच्या देवरी तालुका अध्यक्ष लक्ष्मी मेश्राम, सचिव सीमा मळावी, शर्मिला टेंभुर्णीकर ,सौ. ललिता रामटेके, सरिता कावळे ,सौ. इलमकर, सौ. बावनथळे, संपर्कप्रमुख सौ. आरती जांगडे यांनी नक्षलग्रस्त भागातील चिचगड पोलीस स्टेशनला जाऊन पीएसआय खासबागे, एपीआय तुषार काळेल, डी आय मार्टिन साहेब गोंदिया. तसेच देवरी पोलीस उपविभागीय अधिकारी मा. विवेक पाटील साहेब व पीआय प्रवीण डांगे आणि त्यांचे सहकारी व पोलीस स्टेशन आमगाव येथे पीआय मान.तिरुपती राणे , पीएसआय अक्षय वळसे, पीएसआय शहारे,हे.का. बर्वे, हे.का.घरत, डब्ल्यू. एच .सी चिपे, डब्ल्यू पी. सी. बिसेन, डब्ल्यू. पी .सी गलाकनोज, पो.का.शुभम शेंडे, प्रवीण नेताम चौधरी मळावी इत्यादी पोलीस बंधू भगिनींना राखी बांधून त्यांना त्यांच्या बहिण भावाची कमतरता भासू दिली नाही. याप्रसंगी पोलीस स्टेशन देवरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे  यांनी अत्यंत मनमिळावू सहकार्य करून संघटनेचे आभार मानले.चिचगड पोलीस स्टेशनचे पीएसआय खासबागे यांनी मोलाचे सहकार्य करून संघटनेला वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .

आमगाव येथील पी एस आय अक्षय वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेतर्फे दरवर्षी रक्षाबंधनाचे पवित्र सण विदर्भ अध्यक्ष जयश्री पुंडकर यांनी सुरू केले असून तसेच पुर्वरत राहील अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार व्यक्त केले.