गोंडपिपरी तालुक्यातील घटना
गोंडपिपरी :-प्रेमविवाह करुन भावी जीवनाच्या सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या दाम्पत्यांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे घरगुती कारणातून वाद झाल्याने पत्नीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेतली. तिला वाचवायला तिच्या मागोमाग पतीनेसुद्धा विहिरीत उडी घेतली. मात्र दोघांचाही विहिरीत बुडून अंत झाला.ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा गावात शनिवारला रात्रो ९.३० वाजताचा सुमारास घडली. पती-पत्नीच्या अशा दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण गावातच शोककडा पसरली आहे.प्रकाश शरबत ठेंगणे वय (३०), उषा प्रकाश ठेंगणे वय (२७) अशी मृत दांपत्याचे नाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांतने मागील तीन महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील इल्लूर येथील उषा हिचासोबत आंतरजातीय प्रेमाविवाह केला होता. सुखी संसार सुरु असतानाच शनिवारी रात्री दोघात कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात उषाने घराशेजारील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. तिला वाचविण्यासाठी प्रकाशने सुद्धा लगेच विहिरीत उडी घेतली. दरम्यान शेजारच्या मुलाने हे दृश्य बघून इतरांना या संदर्भातील माहिती दिली.नागरिकांनी गोंडपिपरी पोलिसांना माहिती देताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी घटनास्थळ गाठून विहिरीत शोध मोहीम राबवली असता, दोघांचेही मृतदेह आढळून आले. वृत्तलिहीपर्यंत नेमके आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

