सालेकसा / बाजीराव तरोने
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी सहकारी संस्थेत विकलेल्या धानाला नुकसान झाल्याचे दिसून येत ऑगस्ट महिन्यात सुरुवातीपासूनच सतत सुरू असलेल्या पावसामुळे वेळेवर ध्यानाच्या साठ्याची उचल न झाल्याने तसेच राईस मिलर्स यांच्या अटी व शर्ती मंजूर न झाल्यास भरडाई दर न वाढल्यास , शासनाकडून मंजुरीस विलंब, सतत पाऊस सुरू असल्याने संस्थेत ठेवत जमा ठेवलेल्या धानाला नासाडीचे रूप तयार होण्याची शक्यता अधिक वाढली.एक ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या वेळेत आलेल्या पावसामुळे अनेक आदिवासी सहकारी संस्थेमध्ये ठेवलेला साठा यावर परिणाम त्यामुळे उचलणाऱ्या धानाला घट होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत पावसामुळे काही ठिकाणी वाहन जाण्यास समर्थ तर काही ठिकाणी गोडाऊनची कमतरता तर काही ठिकाणी अतिवृष्टी यामुळे आदिवासी सहकारी संस्था यांना मोठा त्रास होऊन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे वेळेवर ध्यानाच्या साठ्याची उचल न झाल्याने तसेच राईस मिलर्स यांच्या अटी व शर्ती मंजूर न झाल्यास भरडाई दर न वाढल्यास , शासनाकडून मंजुरीस विलंब, सतत पाऊस सुरू असल्याने संस्थेत जमा ठेवलेला धान नासाडी होण्याची शक्यता आहे.
– मूलचंद गावराने
अध्यक्ष आदिवासी सहकारी सोसायटी सालेकसा

