आमगांव : दि. २३-२४ ऑगस्ट २०२४ ला क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन, सेमिनार हॉल, श्री लक्ष्मणराव मानकर इंस्टिट्यूट आमगाव, जिल्हा गोंदिया येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत ९३ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. स्पर्धा सुरळीतरित्या पार पडल्या.
या निमित्ताने आपल्या असोसिएशनतर्फे पोलिस दलात स्पोर्ट्स कोटा मध्ये नुकत्याच नियुक्त झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. स्पर्धा सफलतापूर्वक पार पाडणयाकरिता मा.जिल्हा क्रीडा अधिकारी खूरपुडे मॅडम, मरसकोल्हे सर, तेजसिंह आलोत व हेमंत चावके यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व पंचांनी परिश्रम घेतले. मुकेश शेंडे, भुमेश्वर रहिले, विश्वाश चौहान, मयूर नागमोते, काजल मोरध्वज, सौरभ महापात्र, भाग्यश्री नागमोते, स्वदेश येटरे, चिराग ठाकरे, देवेश बावनकर यांनी पंच म्हणुन काम सांभाळले.