खोडकिडी व गादमाशीच्या नियंत्रणावर कृषि विभागाने सूचविल्या उपाययोजना

0
942

गोंदिया, दि.27 : जिल्ह्यात पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) खरीप हंगामाकरीता 1 जुलै 2024 पासून राबविण्यास सुरुवात झालेली असून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत भात पिकांचे नियमीत सर्वेक्षण कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रीय यंत्रणेमार्फत गावोगावी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन करण्यात येत आहे. कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्या गावात सभा व शास्त्रज्ञ भेट आयोजित करुन शेतकऱ्यांना त्या कीड रोगाच्या नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात येते. क्षेत्रीय यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांच्या शेतात घेण्यात येत असलेल्या नियमीत सर्वेक्षणामध्ये काही तालुक्यात आर्थिक नुकसान पातळीच्या वर खोडकिडीचा प्रादुर्भाव व थोड्या प्रमाणात गादमाशीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. तरी शेतकऱ्यांनी याबाबत खालील प्रमाणे उपायोजना करावी.

        खोडकिडीचे व्यवस्थापन : शेतात 5 टक्के खोडकिडीचे प्रादुर्भावग्रस्त फुटवे दिसताच क्विनॉलफॉस 32 मिली किंवा ट्रायझोफॉस 25 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारावे अथवा ट्रायकोग्रामा जपोनिकम हे परोपजीवी किटक हेक्टरी 50000 या प्रमाणात दर सात दिवसाचे अंतराने 4 वेळा सोडावे.

        गादमाशीचे व्यवस्थापन : शेतात 2.5 टक्के प्रादुर्भाव ग्रस्त चुड दिसताच कार्बोफुरॉन दाणेदार 10 किलो हेक्टरी या प्रमाणात तसेच क्विनॉलफॉस 32 मिली किंवा ट्रायझोफॉस 25 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारावे. असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजित आडसुळे यांनी कळविले आहे.

Previous articleशिक्षणाधिकारी (माध्य.) श्रीमती कल्पना चव्हाण निलंबित
Next articleउत्कृष्ट ग्रंथालय व ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार 25 सप्टेबर पर्यंत अर्ज आमंत्रित