न्यूज प्रभात जिल्हा प्रतिनिधी धर्मपाल कांबळे
चंद्रपूर : भीमशक्ती शहर, जिल्हाचंद्रपूर कार्यकारिणीची आढावा बैठक विश्रामभवन चंद्रपूर येथे भीमशक्तीचे अध्यक्ष कुणाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला भीमशक्तीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एन. डी. पिंपळे, विदर्भ अध्यक्ष पंकज मेश्राम, भीमशक्ती महिला अध्यक्ष अपेक्षा पिंपळे उपस्थित होत्या. अपेक्षा पिंपळे यांनी भीमशक्ती संघटनेत महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी सरोज पुनवटकर, मनोज सांगोळे उपस्थित होते. संचालन प्रतीक्षा पाटील तर आभार पीयष धपे यांनी मानले.