एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी हे अतिदुर्गम गाव. या गावाला जाण्यासाठी अजूनही पक्का रस्ता नाही. वीज नावापुरती असते. मोबाइल नेटवर्क नसल्याने बाहेरील जगाविषयी गावकऱ्यांना फारशी माहिती नाही. शिक्षणाविषयी आस्था नसल्याने शाळेत केवळ आठ विद्यार्थी होते. मांतय्या बोडके यांनी या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढविण्याचा निर्धार केला. गावातच झोपडी बांधून राहू लागले. आज चौदा वर्षांनंतर हे गावच नव्हे तर परिसरातून या शाळेत विद्यार्थी येऊ लागले आहे. पटावर १३० संख्या झाली आहे. कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणासाठी पाठविलेली मुलेही या शाळेसाठी परतू
पुरस्कार जाहीर केला आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून ३०० किमी अंतरावरील सिरोंचा तालुक्यातील पातागुडम हे मांतय्या यांचे मूळ गाव. गावाजवळील अंकिस येथील श्रीनिवास हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. पुढे वर्ध्याला उच्च शिक्षण घेऊन सिरोंचातून डीएड
पूर्ण केले. यानंतर त्यांना जाजावंडीच्या
विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना मांतय्या बोडके.
लागली आहेत. माओवाद्यांच्या गडात शिक्षणाची गंगा वाहू लागली आहे. मांतय्या यांच्या या शिक्षणकार्याची दखल घेत सरकारने राष्ट्रीय शिक्षक
प्राथमिक शाळेत २०१०मध्ये नियुक्ती झाली. साध्या सुविधाही नसलेल्या गावात शिक्षणाचा गंध असण्याचे कुठलेही कारण नव्हते. तरीही या गावातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचा निर्धार मांतय्या यांनी केला. बहुतांश पालक अशिक्षित असल्याने त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. तरीही मांतय्या यांनी माघार घेतली नाही. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद सुरू ठेवला. खेळ, कला, नृत्य, शिक्षण याविषयी घरोघरी भेटी देऊन महत्व पटवून देऊ लागले.
शिक्षक मांतय्या बोडके यांच्या प्रयत्नानंतर जाजावंड येथील विद्यार्थ्यांमध्ये रुची वाढली. त्याचा सकारात्मक परिणाम पटसंख्येवर झाला. ती वाढू लागली. लोकवर्गणीतून मांतय्या यांनी शाळेच्या इमारतीची दुरुस्ती आणि रंगरंगोटी केली. विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देणे सुरू केले. आज ही शाळा डिजिटल झाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपाने घेण्यात आली आहे. जाजावंडीची ही शाळा एटापल्ली तालुक्यात येते. हा तालुका माओवादग्रस्त आहे. यातही जरावांडी गट्टा परिसरात माओवाद्यांच्या सर्वाधिक कारवाया होतात. त्यामुळे शिक्षणाची पेरणी सोपी नव्हती. पण, मांतय्या यांच्या निर्धाराने
आज या परिसरात शिक्षणाचे भविष्य दिसू लागले आहे.
नेटवर्कसाठी लावला
झाडावर अँटेना !
मोबाइल नेटवर्क नसल्याने झाडावर एक अँटेना लावण्यात आला आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण दिले जात आहे. यासोबतच तीन वर्षांपासून या शाळेतील विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमध्ये अव्वल क्रमांक पटकावत आहेत. हे पाहून दहा पालकांनी एटापल्ली आणि आलापल्लीच्या कॉन्व्हेंटंमधून मुलांना काढून मांतय्या यांच्या सरकारी शाळेत पाठविण्यास सुरुवात केली आहे. सध्या या शाळेत वसुली, ताडगुडा, गट्टा, गट्टागुडा, गट्टाटोला, पुस्कोटी राजवंडी टोला अशा चार किमी परिसरातील दहा गावांतील विद्यार्थी या शाळेत येत आहेत.