अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्डयात टाकून हवेत फिरणाऱ्यांना जमिनीवर आणा.. राजे अम्ब्रीशराव आत्राम,भामरागड येते पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न, दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती..

0
205

*##अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्डयात टाकून हवेत फिरणाऱ्यांना जमिनीवर आणा.. राजे अम्ब्रीशराव आत्राम*

 

भामरागड- मूलचेरा येतुन माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या झंझावाती दौऱ्याची सुरुवात केली होती, त्यानंतर भामरागड येथे काल भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेत आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग राजेंनी फुंकले, ह्यावेळी तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रातुन आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, बूथ समिती सदस्य ह्यांची मोठी गर्दी झाली होती त्यांनी राजेचे जोरदार स्वागत केले ..!!

ह्यावेळी राजेंनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना गेल्या ५ वर्षात संपूर्ण विधानसभा क्षेत्रात विकासाचे एक मोठे काम झाले नाही, आजही मी केलेले विकासकामेच प्रगतीपथावर आहेत उलट संपूर्ण विधानसभा क्षेत्र सद्या खड्डयात गेला आहे, रस्ते, आरोग्य, वीज ह्या प्रत्येक क्षेत्रात जनता कमालीची हैराण झाली असतांना आपले मंत्री साहेब सद्या कंपनीचा आशीर्वादाने हेलिकॉप्टर दौरे करीत हवेत फिरत आहेत, जनतेच्या समस्यांशी त्यांना काहीही देणेघेणे नाही अशांना हवेतून जमिनीवर आणण्याची वेळ आत्ता आली आहे, त्यासाठी त्यांची खरी जागा आगामी विधानसभा निवडणुकीत दाखवा, त्यासाठी आजपासूनच प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागून मोठ्या मताधिक्याने मला निवडुन येण्यासाठी आशीर्वाद द्या असे आवाहन ह्यावेळी राजेंनी केले ह्यावर *राजे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है  अशी जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी राजेंना दाद दिली..!!

अहेरी जिल्हा बनविण्याचा संकल्प करीत राजेंनी सुरजागड प्रकल्पात ओरिसा, बिहार, झारखंड, तेलंगणा, तमिळनाडू येतील लोकांना नौकरी देऊन स्थनिकांना चौकदार केले जात असल्याबद्दल जोरदार टीका करीत आपण जिंकल्यावर हे सर्व चित्र बदलविणार असल्याचा शब्द ह्यावेळी दिला..!!

ह्यावेळी जेष्ठ नेते प्रकाश सावकार गुडेल्लीवार, सुनीलभाऊ बिस्वास, रवीभाऊ नेलकुद्री, चिन्नना चाकूरकर,जाधव हलधर, राजू येग्लोपवर सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

Previous articleगोंदिया नवभारतचे एजंट सुमित पांडे यांचे निधन
Next articleयुगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाचे निकृष्ठ दर्जाचे काम करण्याऱ्या दोषींवर कार्यवाही करा