अहेरी-
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी सरास विक्री सुरू आहे अहेरी तालुक्यात दारूचे अनेक ठिकाणी साठे अहेरी पोलीस ने जप्त केलेले आहे.
आहेरी पोलीस स्टेशन ला माहिती मिळताच दारूने भरलेली कार ताब्यात घेतली
अप. क्र.- 250/2024 कलम 65 (अ) ,83 महादाका अंतर्गत
फिर्यादी सर तर्फे- सपोनि/मंगेश गिंब्या वळवी, वय-42 वर्ष पोलीस स्टेशन अहेरी जिल्हा गडचिरोली आरोपीचे नाव-
श्रिनीवास शंकर नरहरी,वय 35 वर्ष धंदा मजुरी,अतिक अहमद शेख वय 32 वर्ष धंदा मजुरी, दोन्ही रा. बाबुपेठ चंद्रपुर तालुका- जिल्हा- चंद्रपुर.
आरोपी नामे-.राहुल मलया मेडी वय 45 वर्ष रा.ता.अहेरी जि.गडचिरोली
घटनास्थळ मौजा -भुजंगरावपेठा येथे
घटना, ता. वेळ – दिनांक 29 /08/2024 चे 01•30 ते 02 •20 वा. दरम्यान
दाखल ता. वेळ – दि.29/08/2024 चे 05/34 वा. साना क्र 10/2024 मुध्ये माल मिळालेला माल जप्त झाला आहे.
यात रॉयल स्टॅग कंपनीचे 750 एम.एल.मापाचे विदेशी दारुचे 59 नग,बॅ.न.0988 दि.08/07/24 असे लिहलेले, वि.की.प्रती नग-1200/रु प्रमाणे एकुण किमत 70,800/रु.चा माल
रॉयल स्टग कंपनीचे 180 एम.एल.मापाचे विदेशी दारुचे 78 नग,बॅ.न.1390 दि.12/08/24असे लिहलेले वि.कि.प्रती नग 300 /रु प्रमाणे एकुण किंमत 23,400/रु.माल,
रॉकेट संत्रा कंपनीचे 90 एम.एल.मापाचे देशी दारुचे 80 नग,
प्रती नग विक्री किंमत 80/-रु प्रमाणे एकुण किंमत 6,400/-रु ,
ग्रे रंगाची एक जुनी वापरती मारुती सुझूकी कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.43 ए.एन.5200,किंमत 2,50,000/रु
असा एकुण किंमत 3,50,600/-रु चा मुद्देमाल .
दाखल अमलदार – मपोहवा/2255 शिवम्मा नैताम , पोलीस स्टेशन अहेरी
तपासी अंमलदर-पोना/3064 मोहन तुलावी ,पोलीस स्टेशन अहेरी जिल्हा- गडचिरोली मो. नं.- 7038890648
थोडक्यात माहिती याप्रमाणे आहे की , घटना ता.वेळी व ठिकाणी मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरुन प्रोव्हीबाबत पोस्टाफ,दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता यातील वरील आरोपी नी वरील वर्णनाचा व किंमतीचा प्रोव्हीचा मुद्देमाल अवैद्यरित्या बिनापास परवाना विक्री करीता वाहतुक करीत असताना मिळून आल्याने नमुद आरोपीचे कृत्य हे वरील कलमान्वये होत असल्याने त्याचे विरुध्द गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

