



पोलीस स्टेशन आमगाव येथे पोलीस पाटील,शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजन
आमगाव : तालुक्यात आगामी काळात साजरे होणारे पोळा,गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद या सह इतर सण निर्विघ्नपणे व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले.
पोलीस स्टेशन आमगाव कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, उपनिरीक्षक अक्षय वळसे उपस्थित होते.
आमगाव तालुक्यात साजरे होणारे सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्याची आपल्या तालुक्याची परंपरा आहे. तालुक्याची ही परंपरा कायम ठेवत आगामी काळात तालुक्यात साजरे होणारे सण, उत्सव हे शांततेत, एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करावेत असे मत विभागीय पोलीस अधिकारी प्रमोद माडामे यांनी व्यक्त केले.
तसेच यावेळी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळांना संबोधित केले की पोळा,गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण शांततेत पार पाडावे जेणेकरून या सणाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये त्याचे दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले
बैठकीचे संचालन महिला पोलीस हवालदार सत्यशीला छिपे यांनी केले तर आभार उपनिरीक्षक अक्षय वळसे पाटील यावेळी पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


