मुख्य मार्गावरील प्रवाशांचा त्रास कायम; कुलपा मार्गे बस चालवण्याची मागणी
सालेकसा :बाजीराव तरोने
आमगाव-सालेकसा मुख्य मार्गावरील बससेवा बंद करण्यात आल्यामुळे सालेकसा तालुक्यातील सर्वसामान्य प्रवासी विद्यार्थ्यांमध्ये त्राहिमाम आहे. अशात मागील आठ दिवसांपासून लोकांची आजी-माजी लोकप्रतिनिधी यांचा सतत दबाव वाढत चालला परिवहन मंडळाने आमगाव वरून साखरीटोला-सातगाव- मार्गे सालेकसा बससेवा आहे. यामुळे मुख्यालयापासून प्रवास प्रवाशांना थोडा दिलासा आहे. परंतु १२ किलोमीटर अतिरिक्त फेरा मारून बस लागते. तर आमगाव-सालेकसा मुख्य मार्गावरील कावराबांध, पानगाव परिसरातील डझनभर गावातील प्रवासी आणि विद्यार्थ्यांचा त्रास मुळीच नाही. यासाठी कुलपा सुरू करणे आवश्यक
आणि माजलेले ओरड आणि असताना तिरखेडी सुरु केली सालेकसा करणाऱ्या मिळाला चालवावी झालिया, कमी झाला मार्गे बससेवा आहे. वाघनदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला
आठ फूट उंचीपर्यंतचे मजबूत कमानीचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता या पुलावरून आमगाव-सालेकसा ही बससेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सालेकसा ते चांदसूराज, दरेकसा व पिपरिया गावांना जाणारी बससेवाही बंद करण्यात आली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी धावणाऱ्या मानव विकासच्या बसेसही बंद करण्यात आल्या आहेत. बससेवा बंद असल्याने विद्यार्थी ऑटो टॅक्सींच्या प्रतीक्षेत असून ऑटो टॅक्सी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात आहेत. गेल्या आठवडाभरापासून एसटी बंद असल्याने सालेकसा तालुक्यातील महिला व मुलींना
सुरक्षित प्रवासाचा प्रश्न भेडसावत आहे.
या समस्येला अनुसरून बातमी प्रकाशित केली असता त्याची दखल घेत परिवहन विभागाने तात्पुरता उपाय म्हणून तिरखेडी मार्गे सालेकसा बससेवा सुरू केली. परंतु यामुळे समस्या दूर होत नसून आमगाव ते कुलपा (म.प्र) मार्गे साकरीटोला झालिया अशी बससेवा सुरू करणे आवश्यक आहे. या मार्गावरून फक्त दोन किलोमीटर अधिक प्रवास होईल परंतु मुख्य मार्गावरील सर्व गावांना लाभ मिळेल. यासाठी मध्यप्रदेश शासनाची परवानगी घ्यावी लागेल व यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित योग्य कारवाई करण्याची गरज आहे.