ही सरकार बेरोजगाराची नाही. राहुल पुरुषोत्तम दुर्गे…

0
227

ही सरकार बेरोजगाराची नाही…

राहुल पुरुषोत्तम दुर्गे…

अहेरी – शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली आदेश दिनांक २३/०८/२०२४ मुख्यमंत्री युवा कार्यक्रम रोजगार मेळावा अंतर्गत शिक्षक भरती नुकतीच झाली असून त्यात 18 ते 35 वयोगट ठेवली होती मात्र त्यामध्ये 35 वर्षाच्या वर वयोगटावरील अनेक फार्म आले होते एक दिवसा च्या वर वय झाले असता त्यांना निराश हताश होऊन घरी वापस जावं लागले. एकीकडे युवांना रोजगार देऊ असे सरकार डंका वाजवत आहे आणि दुसरी कडे निवृत्त झालेले नोकरदारांना च पेन्शन व नोकरी देऊन मानधन तत्वावर का असेना वीस हजार रुपये देऊन पोट भरलेल्यांना पुन्हा जीव घालत आहे. तिकडे उपाशी पोटी बेरोजगार युवक मात्र रस्त्यावर हिंडत आहेत.युवा वर्गावर अन्याय होत आहे.

 

10 ते 20 वर्षा पासून डीएड बीएड होऊन घरी बसून आहे अनेक वर्षापासून शिक्षकांची भरतीची नाही त्यामुळे अनेक लोक चाय टपरी चालवत आहेत तर छोटा मोठा व्यवसाय करत आहेत.असे युवा कित्येक लोक रोजनदारी वर जात आहेत. एक ना एक दिवस नोकरीची संधी मिळेल या वेड्या आशेने कितीतरी दिवस रात्र एक करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. परंतु या युवकांना साध्या कंत्राटी बेसिक वर सुद्धा रोजगार देण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे.गडचिरोली जिल्हात १००० हुन डीएड बीएड धारकांची वयोमर्यादा ३५ च्या वर होऊन घरी बसले आहेत.अश्या शिक्षणाचा काय अर्थ असे त्यांना वाटत आहे अनेक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध नाही.

राजकारणी पुढारी मतांसाठी फक्त रोजगाराची भाषा करत आहेत. जिल्ह्यातील अनेक तरुण तरुणी पदव्या घेऊन डिग्र्या घेऊन घरी बसून आहेत त्यांचा कोणी विचार करत नाही.. सर्वत्र मतांचा बाजार दिसून येत आहे. सरकारला लाडकी बहीण आठवते काही हरकत नाही परंतु अनेक तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या भविष्याचे काय? एकंदरीत सरकार तरुणांना देशात बेरोजगारांची फौज निर्माण करत आहे असेच म्हणावे लागेल…

Previous articleतासपत्तीवर जुगाराचा खेळ खेळणाऱ्या सात जुगाऱ्यांना सापळा रचून शिताफीने घेतले ताब्यात… गुन्हा दाखल
Next articleकारंजा येथील 53 वर्षीय महिला घरून निघून गेली…