आमगाव : श्रीमती सुग्रताबाई तुकाराम दोनोडे वय 53 वर्ष राहणार कारंजा ही महिला आपल्या घरून निघून गेली. त्यांचे पती तुकाराम दोनोडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार सुग्रता दोनोडे यांची प्रकृती बरोबर नसल्याने आमगाव येथील डाँ.जायस्वाल यांचा उपचार सुरू होता.
घरून जातेवेळी त्यांनी घरच्या मंडळीला सांगितले की, आमगाव जात आहे परंतु ती सायंकाळ पर्यंत कारंजा येथे परत आलेली नाही तेव्हा तिच्या पतीने पोलिसात तक्रार दिली तक्रारी अनुसार या महिलेच्या चेहरा लांब व चेहरा सावळा तसेच ती पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे. तरी ही महिला कोणालाही दिसली किंवा आढळल्यास 9403360437 या क्रमांकावर किंवा भोजराज राजाराम हत्तीमारे मु. जवरी पो. चिरचाळबांध ता. आमगाव जि. गोंदिया या पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.