अमित कुवरलाल उइके याचा अपघाती मृत्यु की मर्डर ?

0
1193
1

सामाजिक कार्यकर्ता माइकल मेश्राम यांचे सालेकसा पोलीस यांना लेखी निवेदन…

  सालेकसा / बाजीराव तरोने

सालेकसा तालुक्यातील पांढरी ग्रामपंचायत अंतर्गत रूमनटोला छोट्याशा गावातील दारिद्ररेषेखाली परिवरातील २०ते २५ वर्षाचा मुलगा अमित कुंवरलाल उईके याचा मागील अड़ीच वर्षा पूर्वी अपघातात दुर्दैवी मृत्य होतो. तर हा अपघाती मृत्यु ? की वेल प्लान मर्डर ? असा प्रश्न निर्माण हाेत आहे.
सविस्तर असे की, मृतक अमित याचे वडील वारल्या नंतर लहानपणातच परिवाराची जिम्मेदारी घ्यावी लागली. परिवारात आई, बहिन, आणि स्वतच्या उदर निर्वाहाची जवाबदारी अंगी घ्यावी लागली म्हणून त्याने आपले शिक्षण सोडून हात मजूरी करायला लागला. याच दरम्यान त्याच गावातील शेजारी असलेला मनोज नावाच्या व्यक्ति ने अमित च्या नावावर जेसीबी मशीन फाइनेंस करून घेतली व मनोज हा मशीनिचा उपयोग स्वत करत असुन त्याची हजारों रूपयाची किस्त स्वताच भरत होता. मनोज ने अमीत लाच ड्राइवर म्हणून रोजनदारी वर ठेवला होता.


मृतक अमित कुवरलाल उईके रा. रूमनटोला / पांढरी पोस्ट पाऊलदौना ता. सालेकसा जि. गोंदिया ला वास्तव्य करत होता. याच्या नावावर मनोज याने जे.सि.बि. घेतली होती. मृतक अमित हा याचा मित्र असुन घरा मागे राहत होता. मृतकाचा नावावर घेतलेली जे.सि.बि. ही मनोज ने आपल्याच ताब्यात ठेवली आहे. ह्या जे.सि.बि. वर लाखो रूपयाचे फायनन्स मृत्यकाच्या नावावर केला होता आणि फायनन्स करता वेळी फॉयनन्स कंपनी ही त्या व्यक्तीच्या नावावर इन्सोरेन्स देखील करत असतो. की अनअपेक्षीत घटना झाल्याने उर्वरित रक्कम कंपनीला परत बिम्या च्या स्वरूपातुन मिळावा. सदर जे.सि.बि. ची कीस्त ही मनोज बल्हारे हा भरत होता. मृतक अमीत याचा मृत्यु चा फायदा मनोज बल्हारे यालाच मिळणार यातुन स्पष्ट होते.
दि.२५/०४/२०२२ ला अमीत कुवरलाल उईके याची अपघाती मृत्यु पांढरी खेडेपार मार्गावर एका सुनसान जागी सायंकाळ च्या सुमारस एकटा बाइक ने येते वेळी झाली व याची माहिती सकाळी लोकाना मिळाली असे गावातील काही नागरीक याना विचारले असता माहिती मिळाली. परंतु हा मार्ग संपूर्ण सुना असुन आवागमन कमी असल्याने अपघाताची शक्यता कमी राहुन फायदा होण्यासाठी हत्या करून अपघाताची प्रारूप देण्यात आली असेल अशी शक्यता नाकारता येत नाही ??. अमीत ची हत्या करून जे.सि.बी. वर चालत असलेली किस्त संपणार? व आपली गाडी फायन्सस मुक्त होणार? या उद्देशाने त्याची हत्या करण्याचे कारण स्पष्ट समजत आहे. असे दिसून येते.
मृतक अमीत कुवरलाल उईके याचा सोबत त्याची आई सुगनबाई कुवरलाल उईके वय अंदाजे ५५ वर्ष व त्याची पत्नी कलाबाई अमीत उईके ह्या राहत होत्या कंपनी नियमाप्रमाणे नॉमिनी हे पत्नी व आई असतील हे असते आणि होत्या सुद्धा पण पण मनोज याने अमीत चा मृत्यु नंतर अमीत ची आई हीच्या सांगितल्या प्रमाने खातेदार सुगनबाई कुवरलाल उईके बँक ऑफ महाराष्ट्र खाते क्र. ६०२६६२१६९९२ या खात्याचा रिकाम्या चेक वर सही घेवून गेला की बिम्याचे पैसे मिळत आहेत. त्याच प्रमाणे मृतकाची पत्नी हीच्या आमगाव येथील लाल रंगाची बैंक पासबुक कदाचित एक्सीस बँक? च्या खात्याचे चेक सुद्धा घेवून गेला व अजुनपर्यंत बिम्याचे पैसे परत आणुन दिले नाही. ह्या सर्व प्रकरणात दिसुन येत आहे की अमीत चा मृत्यु चा फायदा गैरअर्जदार यालाच होईल काय ? म्हणून अमीत ची हत्या करवली ? आणि त्याला अपघात असा प्रारूप दिला? प्रकरणात मोड आनुन पोलिस यांची दिशा भूल करण्यात आली असे ही समजून येत आहे. काही दिवसा आधी असीच एक घटना सालेकसा तालुक्यात झाली असुन घटनेचा उलाघडा सीमा लगतच्या खैरागढ़ पोलीस यानी केला होता . करिता या प्रकरणात ही पुनस्च चौकशी व्हावी म्हणून सामाजीक कार्यकर्ता, तालुका प्रमुख युवा सेना शिवसेना ( शिंदे गट), तथा पत्रकार माइकल मेश्राम यानी या प्रकरणात ३०२ प्रमाणे चौकशी करण्यात यावी म्हणून सालेकसा पोलीस याना लेखी निवेदन केले आहे. आता घटनेच्या अडीज वर्षानंतर सालेकसा पोलीस याची चौकसी करू शकेल? सालेकसा पोलिसाना यावर कही सुराग हाताला लागणार? अमित आणि त्याचा वृद्ध आई आणि पत्नीला न्याय मिळेल? असा प्रश्न तालुक्यातील जनता करत आहे.