शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग…

0
2399

 गोंदियाच्या तिरोडा पोलिसांत गुन्हा दाखल…

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षकाचे केले तडकाफडकी निलंबन…

गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या मोबाइलवर अश्लील फोटो व मॅसेज करून शिक्षकाने विनयभंग केला. मुलीच्या मोबाइलवर आलेल्या व्हॉट्सअँप मॅसेजमुळे हा प्रकार उघडकीस आला.   

मुलीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. शाळेतील शिक्षक उमेश मेश्राम हा पीडित मुलीच्या घरी गेला होता व तिची छेड काढली होती. त्यानंतर त्याने तिच्या व्हॉट्सअँपवर फोटो व मॅसेज टाकले होते. मात्र, पीडित मुलीने आपल्या पालकांना याबाबत सांगितले व तिरोडा पोलिसांत तक्रार दिली. तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६०२, कलम ७४, ७५ (१), ७३, ७८, ३३२ अनु. जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून  शुक्रवारी शिक्षकाला रात्री ९ वाजता अटक केली. घडलेल्या घटनेबद्दल प्राचार्य संजय जाधव यांना विचारले असता त्यांनी, ही घटना शाळेच्या परिसरातील नसून बाहेरची असल्याचे सांगितले. या घटनेची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनासुद्धा करण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी शिक्षकाला तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले.