
जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले
सिहोरा येथिल रहिवासी यशवंतराव ढबाले यांचा 31 ऑगस्टला माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या हस्ते सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. एम.ए. डीएड शिक्षण घेऊन उच्च श्रेणी शिक्षक वाय.जी.ढबाले हे सुकळी नकुल येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते . ते 36 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. सन 1988 मध्ये बेटाळा येथील शाळेत नियुक्ती झाल्यानंतर 2011 मध्ये त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाळेत निवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये शाल व श्रीफळ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, शिक्षक मंगेश शहारे, सरपंच प्रमिला नागपुरे, उपसरपंच सोहनलाल पारधी,ग्रा. पं.सुनील शिवणे, अरविंद गोंडाणे,निलेश गोंडाणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्चना सहारे, रेखा रहांगडाले, मनीष रहांगडाले, प्रभारी मुख्याध्यापक एस.वाय.बिसने, टी.आर.बांगरे, विकास खोब्रागडे, भाग्यश्री रहांगडाले, चंद्रकला गोंडाणे, सर्व विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.


