पोलीस पाटील,शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांची बैठकीचे आयोजन
सालेकसा/बाजीराव तरोने
तालुक्यात आगामी काळात साजरे होणारे पोळा,गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद या सह इतर सण निर्विघ्नपणे व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन सालेकसा चे पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांनी केले.
पोलीस स्टेशन सालेकसा कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सालेकसा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक भूषण बुराडे हे होते.यावेळी सालेकसा तालुक्यात साजरे होणारे सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करण्याची आपल्या तालुक्याची परंपरा आहे. तालुक्याची ही परंपरा कायम ठेवत आगामी काळात तालुक्यात साजरे होणारे सण, उत्सव हे शांततेत, एकमेकांच्या हातात हात घालून साजरे करावेत असे मत सालेकसा चे पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांनी व्यक्त केले.
तसेच यावेळी पोलीस उपनिरीक्षक मयुरी नागदेवे यांनी पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळांना संबोधित केले की पोळा,गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण शांततेत पार पाडावे जेणेकरून या सणाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये त्याचे दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले
बैठकीचे संचालन जितेंद्र पगरवार यांनी केले तर आभार प्रिती उके यांनी मानले.यावेळी पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

