वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :-01 सप्टेंबर 2024
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जेवढा पगार मिळतो तितकाच एसटी कार्यशाळा कर्मचारी यांना मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसह,एसटी कामगारांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाने दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी बैठक आयोजित केलेली होती परंतु शासन प्रशासनाने एसटी कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षित करून सदरची बैठक पुढे ढकलल्यामुळे व आजमितीस बैठकीच्या तारीख उलटून ११ दिवस होऊनही शासनाने संयुक्त कृती समिती सोबत बैठक न घेतल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच राज्य परिवहन विभागीय कार्यशाळा वर्धा येथील कर्मचार्यांनी शासन प्रशासनाचा निषेध म्हणून छातीवर काळया फित लावून निषेध नोंदविण्यात आलेला आहे.
यावेळी संयुक्त कृती समितीतील सर्व विभागीय कार्यशाळा वर्धा येथील पदाधिकारी व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

