पोळ्याच्या पूर्व संध्येला उसळली गर्दी…
पाटील चमूने मारली बाजी….
आमगाव : बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. यात त्यांचे मित्र त्याला हातभार लावायचे. त्याच माण्यतेचा गजर करीत दरवर्षी कृष्ण गोपाळ जन्म उत्सव निमीत्त सर्व कृष्ण भक्त त्यांचा वार्षिक दहीहंडी उत्सव आयोजित करून या घटनेचे स्मरण करतात.
याचेच स्मरण आमगाव येथे अष्टविनायक परिवार यांच्या वतीने सोना टॉकिज प्रांगणात पोळ्याच्या पूर्व संध्येला दही हांडी उत्सव कार्यक्रम आयोजित करून करण्यात आले होते.
यावेळी दहीहंडी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मुकेश अग्रवाल,मनीष असाटी,मुकेश जांगळे,संस्कार असाटी,सोनू असाटी, स्वामी यसेस्वरानंद, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे,उपनिरीक्षक अक्षय वळसे,दिपाली साळुंके,राजकुमार पुराम,सविता पूराम, अंबरलाल मडावी,अर्चना मडावी, प्रमोद कटकवार,दिलीप कटकावर, रुपेश अग्रवाल, यशवंत मानकर,बाळाराम व्यास,नवीन जैन,सुरेश कोसरकर,अनिल जोशी,राजू पटले,नरेंद्र बाजपेयी,सुषमा भुजाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी दही हंडी फोडणाऱ्या कृष्ण गोपाळ टोळीने एकच नाद सोडला होता तर दही हांदी फोडताना यावेळी एकच थरार अनुभवायला मिळाले.
यावेळी कृष्ण गोपाळ यांच्या वेशभूषा स्पर्धा ही घेण्यात आले होते. लहान बालकांना आकर्षित वेशभूषा करून स्पर्धेत नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी पाटील गृप गोपाळानी स्पर्धेत प्रथम तर रॉयल फिटनेस चॅलेंजर्स ने द्वितीय पुरस्कार पटकाविला.
दहिहंडी कार्यक्रमात यावेळी गोपाळ टोळी सह नागरिकांची तुफान गर्दीने पटांगण फुलून आले होते.तर दही हंडी फोडणाऱ्या गोपाळानी आमगावात मथुराच गाजविली. विशेष म्हणजे अष्टविनायक परिवार यांच्या वतीने धार्मिक आध्यात्मिक व सामाजिक कार्याची प्रेरणा ही नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून राबविण्यात येतात.