आमगांव : तालुक्यातील चिरचाळबांध येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापण समिती गठण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपसरपंच सुधीर पटले यांच्या अध्यक्षतेखाली व संपूर्ण पालक वर्गाच्या उपस्थितीत समिती गठीत करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी केवलचंद भाजीपाले उपाध्यक्ष म्हणून सौ. वेदिका कैलाश पटले यांची तर सदस्य म्हणून. सौ. लक्ष्मी पटले, सौ. सुरेखा वाकले, मनोज बळमे, मुलचंद तरोने, भरतराम मेश्राम, सौ. सरिता भाजीवाले, अरूण येरपुडे, सौ. गुणवंता पुसाम, दिलीप राऊत ग्राम पंचायत गट. सौ. शिलालाई बाटबर्वे तर, शिक्षक प्रतिनिधी म्हणून एस. एस. वाकले, शा.व्य.समितीचे सचिव म्हणून मुख्याध्यापक एन. बी. बिसेन , विद्यार्थी प्रतिनिधी, रागीनी भांडारकर, दिव्यांशु पाठक यांची निवड करण्यात आली.
सभेचे संचालन एम. बी. वैद्य तसेच आभार प्रदर्शन स्वाती जाधव मॅडम यांनी केले. शाळेतील शिक्षक डब्लू.डी. किरमोरे. जी.पी. शिवणकर, व्ही.एस. डोंगरे, एस.आय. बिसेन यांनी सहकार्य केले.