अवैध देशी विदेशी दारु विक्री करीता साठवुन ठेवलेल्या ९,३५५०० मुद्देमालासह जप्त…

0
453
1

-अवैध देशी विदेशी दारु विक्री करीता साठवुन ठेवलेल्या दारु विक्रेत्यावर धाड :-

 

दिनांक ०२.०९.२०२४ रोजी बैल पोळा व तान्हा पोळा व दिनांक ०७.०९.२०२४ रोजी गणेत्सव व इतर महत्वाचे उत्सव शांततेत पार पाडुन उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवु नये या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्यीत चोरुन चालणा-या अवैध दारु धंदयावार आळा बसविण्याचे अनुषंगाने निलोत्पल पोलीस अधिक्षक गडचिरोली, एम. रमेश अपर पोलीस अधिक्षक अहेरी, अजय कोकाटे, उपविभागिय पोलीस अधिकारी अहेरी, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अहेरी चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री, स्वप्नील ईज्जपवार, यांचे नेतृत्वाखाली सपोनि मंगेश वळवी, पोलीस उपनिरीक्षक श्री. सागर माने, पोउपनि श्री. अतुल तराळे, पोहवा /१८५० निलकंठ पेंदाम, पोना ५३३७ हेमराज वाघाडे, पोशि/५३७३ शंकर दहीफळे, मपोशि/८०६४ राणी कुसनाके, चापोहवा /२७९६ दादाराव सिडाम हे दिनांक ०२.०९.२०२४ रोजी अवैद्य धंदयावर आळया घालण्याकरीता पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन मौजा कोलपल्ली ता. अहेरी येथील आरोपी नामे १) देवाजी निला सिडाम वय ३४ वर्षे, २) दिलीप रामा पोरतेट वय २८ वर्षे, ३) संपत पोच्चा आईलवार वय ३८ वर्षे सर्व रा. कोलपल्ली ता. अहेरी जि.

 

गडचिरोली यांचे राहते घरी धाड टाकुन १) रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या ९० मिली मापाच्या एकुण १०,००० सिलबंद निपा किंमत ८,००,०००/-रु.,

 

२) किंगफिशर स्टॉग बिअर कंपनीच्या ६५० मिली मापाच्या एकुण ८० नग बॉटला किंमत २४,०००/- रु.

 

३) हॉयवर्डस ५००० स्टॉग बिअर कंपनीच्या ६५० मिली मापाच्या २३० नग सिलबंद बॉटला किंमत ५७,५००/-रु.

 

४) ऑफिसर चॉईस कंपनीचे १००० मिली मापाचे ५४ नग सिलबंद बंपर किंमत ५४,०००/- रु. असा एकुण ९,३५,५००/-रु. चा अवैद्यरित्या देशी विदेशी दारुचा मुद्देमाल विना पास परवाना मिळून आला.

 

पोउपनि सागर माने पोस्टे अहेरी यांचे लेखी फिर्यादवरुन आरोपी नामे १) देवाजी निला सिडाम वय ३४ वर्षे, २) दिलीप रामा पोरतेट वय २८ वर्षे, ३) संपत पोच्चा आईलवार वय ३८ वर्षे सर्व रा. कोलपल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली यांचे विरुध्द पोस्टे अहेरी अपराध क. २५८/२०२४ कलम ६५ (ई), ८३ अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

 

यापुढे सुध्दा अशीच कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.