गंगाबाईत पोषण जनजागृती सप्ताह चे उद्घाटन

0
127
1

गोंदिया : स्थानिक बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात 1 ते 7 सप्टेंबर 24 दरम्यान आयोजित राष्ट्रीय पोषाहार जनजागृती सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने बाह्यरुग्ण विभागात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ नितीका पोयाम यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या वेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ बागडे डॉ अनिल परियाल प्रमुख मार्गदर्शिका म्हणून के टी एस रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर
तसेच आहार तज्ञ कोमल अवस्थी व स्वाती बनसोड
मेट्रोन अर्चना वासनिक आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आहार समुपदेशिका स्वाती बनसोड यांनी 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान आयोजित पोषाहार सप्ताह निमित्ताने विविध उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.
राष्ट्रीय पोषाहार सप्ताह निमित्ताने उपस्थित गर्भवती माता आणि रुग्ण व नातेवाईक यांना मार्गदर्शन करताना डॉ सुवर्णा हुबेकर यांनी या वर्षी राष्ट्रीय पोषण सप्ताह च्या थीम नुसार सुपोशीत भारत सशक्त भारत सक्षम भारतचा संकल्प आपल्याला करावयाचा आहे असे सांगितले.

गोंदिया सारख्या आदिवासी दुर्गम जिल्ह्यात किशोरवयीन मुली कुपोषित असल्यामुळे पुढे चालून लग्नं झाल्यावर पोषणाबाबत साक्षर नसल्याने कमी वजनाचे व अविकसित नवजात शिशु जन्माला घालतात त्यामुळेच कोवळी पानगळ वाढते तसेच बालमृत्यू व माता मृत्यू वाढतात म्हणून मुलींकडे जन्मा पासूनच चांगले लक्ष द्या व त्यांना वयात आल्यावर लोह व कॅलशियम युक्त व प्रथिनयुक्त संतुलित आहार द्या आणि कुपोषण टाळा..! डॉ सुवर्णा हुबेकर यांनी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या कमी खर्चाच्या वस्तू पासून पौष्टीक खाऊ कसा तयार करावा या बाबत उपस्थित माता पालक यांना विस्तृत माहिती दिली.
या वेळी कार्यक्रमच्या उद्घघाटिका डॉ नितीका पोयाम यांनी सर्व परोमेडिकल स्टाफ यांना वेळोवेळी हिमोग्लोबिन रक्त तपासण्या चे आवाहन केले व
पोषाहार सप्ताह निमित्ताने आयोजित उपक्रमात लोकसहभाग वाढविण्या बाबत आवाहन केले.
राष्ट्रीय पोषाहार सप्ताह बाबत आहार तज्ञा कोमल अवस्थी यांनी पोस्टर व माहिती पत्रका द्वारे चांगली माहिती दिली.
आभार प्रदर्शन नर्सिंग स्टाफ श्रीमती दीपाली
पानतावणे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन आर सी च्या स्टाफ ने परिश्रम घेतले.